Police at the crime scene in Pathardi Phata after brutal daytime murder Saam Tv
क्राईम

Nashik Crime: १२ तास, २ खून, नाशिक हादरले; नागरिक दहशतीखाली, गुंडांचं पोलिसांनाच थेट आव्हान

Nashik Crime Report: नाशिक शहरात अवघ्या १२ तासांत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहर हादरले आहे. पाथर्डी फाटा आणि सातपूर परिसरात दोन तरुणांचा निर्दय खून झालाय.

Omkar Sonawane

नाशिक: अवघ्या १२ तासांच्या आत नाशिक शहरात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील पाथर्डी फाटा परिसरात एका तरुणाचा भर दुपारी खून केल्याची घटना घडली आहे. दगडाने ठेचून एका तरुण व्यक्तीची हत्या केली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव आणि हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. घटना घडलेल्या ठिकाणी इंदिरानगर पोलीस पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलीय.

हत्या झालेल्या तरुणाला एका गोणीत भरून वैद्यकीय शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त पडल्याचे दिसून येतेय. ही घटना हत्या पथर्डी परिसरातील एका कॅफेत घडली. भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी घटनास्थळावर पोहोचून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने गुन्ह्यातील आरोपी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पैसे न दिल्याने मध्यरात्री तरुणाची हत्या

आज मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर येथे एका 22 वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. हा तरुण हा एका सातपूर येथील एका कंपनीत कामगार होता. पार्थ पॅलेससमोर रात्री साडेदहा ते अकरावाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. जगदीश भैय्या वानखेडे असे या तरुणाचे नाव होते. हा तरुण मूळचा सटाणा या गावचा होता.

22 सप्टेंबर बुधवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर जगदीश हा आपल्या दुचाकीवरून सातपूर येथील आपल्या घरी जात होता. यावेळी काही गुंडांनी त्याला अडवत पैशांची मागणी केली. मात्र, जगदीशने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कोयता आणि चाकूने सपासाप वार करत त्याचा खून केला. या हल्ल्यात जगदीशच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या 12 तासांत दोन तरुणाचा खून झाल्याने नाशिक शहर हादरून गेलेय. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये दररोज हत्या, हाणामारीसारख्या घटना घडत आहेत आणि त्या घटना सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून थेट पोलिसांना आव्हान देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

Helmet: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? कसं ओळखाल?

Maharashtra Live News Update : मेंढपाळ धनगर बांधवांना शिवसेनेची आर्थिक मदत

बेवफा! नवरा बेडरूममध्ये गेला, बेडमध्ये नको त्या अवस्थेत लपला होता बायकोचा बॉयफ्रेंड, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT