WhatsApp DP youth murder Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्त नवीन WhatsApp DP, नवऱ्याची मैत्रीण भडकली, नाशिकमध्ये तरुणाची हत्या

Nashik Crime News : नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दीत विल्होळीत घडलेल्या हत्येप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका महिलेसह पुरुषाला अटक केली आहे.

Prashant Patil

नाशिक : लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्त तरुणाने पत्नीसोबत ठेवलेल्या 'व्हॉट्सअॅप डीपी'मुळे त्याची मैत्रीण भडकली. त्यामुळे तिने भावासह नातलगांच्या मदतीने संबंधित तरुणाला मारहाण करीत त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दीत विल्होळीत घडलेल्या हत्येप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका महिलेसह पुरुषाला अटक केली आहे. या दोन्ही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३ मे रोजी सकाळी विल्होळी शिवारातील जैन मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरज काशीनाथ घोरपडे (वय ३९, रा. सातपूर) याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी सुरजच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

तपासादरम्यान शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानुसार अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरमध्ये सापळा रचून संशयित इंदू विजय साळवे हिच्यासह तिचा भाऊ शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (वय २७, संघर्षनगर, विल्होळी) या दोघांना अटक करून नाशिक तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलं.

सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, मुक्तार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, नाशिक तालुका पोलिसांनी दोन्ही संशयितांना बुधवारी १४ मे रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले यांचे पथक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT