Nashik Crime News: Saamtv
क्राईम

Nashik Crime News: सहलीला आलेल्या विद्यार्थी अन् शिक्षकांच्या साहित्यावर डल्ला, तब्बल २० मोबाईल लंपास; सराईत गुन्हेगार अटकेत

Nashik News: शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ बघितल्यानंतर सहलीतील विद्यार्थी व शिक्षक हे नाशिकच्या गोदा घाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी राहिले होते. यावेळी तब्बल २० मोबाईल चोरीला गेले होते.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक|ता. १५ जानेवारी २०२४

Nashik Crime News:

शाळेच्या सहलीसाठी आलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचे मोबाईल चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तपास करत संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून १८ चोरीचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. (Crime News in Marathi)

डिसेंबर महिन्यात यवतमाळ (Yavatmal) येथील नारायण लीला शाळेची सहल ही नाशिक (Nashik) शहरात आली होती. शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ बघितल्यानंतर सहलीतील विद्यार्थी व शिक्षक हे नाशिकच्या गोदा घाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेत मुक्कामी राहिले होते.

या ठिकाणी गाठ झोपेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचे मोबाईल चार्जिंगला लावलेले होते तर काहींचे मोबाईल हे उशाशी होते. यावेळी सर्वजण गाढ झोपलेले असल्याचा फायदा घेत चोरट्याने २० मोबाईल लंपास केले होते. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयताचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच संशयित हा द्वारका परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला शिताफीने ताब्यात घेतले तसेच त्याची कसून चौकशी करत त्याच्याकडून २० पैकी 18 मोबाईल हस्तगत करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT