Nashik Crime 
क्राईम

Nashik Crime: आपटी बॉम्ब घेऊन देण्याचे अमिष देत ७ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

Nashik Crime: एका व्यक्तीने आपटी बॉम्ब घेऊन देण्याचं आमिष देऊन एका चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. याप्रकरणात पोलिसांनी संशयिताला अटक केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तरबेझ शेख, साम प्रतिनिधी

नाशिक घराबाहेर दांडिया खेळणाऱ्या ७ वर्षाच्या चिमुकलीला आपटी बॉम्ब घेऊन देण्याचे अमिष दाखवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना जुने नाशिक परिसरात घडली असून या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पीडित चिमुकली नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडिया खेळत होती. स्थानिक रहिवासी असलेला संशयित महेश रघुनाथ वांद्रे (वय ४७) याने पीडितास आपटी बॉम्ब घेऊन देतो, असे आमिष दाखविले. तिला एका पडक्या इमारतीत घेऊन जात तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं अश्लील वर्तन करत विनयभंग केला. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयास सांगितला. कुटुंबीयांसह परिसरातील काही जणांनी संशयीताला मारहाण देखील केली. भद्रकाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य घेता तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितास ताब्यात घेतले. पीडितास विश्वासात घेऊन चौकशी केली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

यापूर्वीही काही दिवसांपूर्वी संशयिताने असाच प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानिमित्ताने लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

परभणीत शाळेत चिमुकलीवर अत्याचार

परभणीत बदलापूरची पुनरावृत्ती घडलीय. परभणीच्या सोनपेठ शहरात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालवाडीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. परभणीतील सोनपेठ शहरातील शाळेतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोनपेठ शहरातील एका नामवंत इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT