Nashik Breaking Saam Tv
क्राईम

Nashik Breaking: भयंकर! पंचवटीत मानवी कवट्या अन् हाडांनी भरलेली गोणी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Human Skulls And Bones Found In Panchvati Area: पंचवटी परिसरात एका गोणीत मानवी कवट्या आणि हाडे आढळले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका भोंदू बाबाला अटक केली आहे.

Rohini Gudaghe

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिक शहरात पंचवटी परिसरात एका गोणीत मानवी पाच ते सहा कवट्या आणि हाडे आढळले होते. त्यामुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात मानवी हाडांची गोणी आढळली होती. ही मानवी कवट्या आणि हाडे असलेली गोणी पंचवटी (Panchvati Area) पोलिसांनी ताब्यात घेतली होती.

या कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. भर वस्तीत मानवी कवट्या आढळल्यामुळे चर्चांना उधाण उधाण आले (Nashik Breaking) होते. पोलिसांनी मंदिराच्या पुजाऱ्याला आणि इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत घटनेची चौकशी केली होती. मंदिराच्या परिसरात मानवी प्लास्टिकच्या कवट्या आणि हाडे आढळून आल्याने नेमका हा काय प्रकार आहे? यासाठी पोलीस कसून तपास करत होते.

गोणीत असलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पंचवटी पोलिसांनी सखोल तपास करत हे मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं समोर आलं (Human Skulls And Bones Found) होतं. परंतु यामागील सूत्रधार कोण? हा प्रश्न मात्र गुलदस्तात होता. त्यामुळे पोलिसांकडून तपास सुरू सुरूच होता.

मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्याच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. नाशिकच्या पंचवटी हद्दीत अघोरी विद्या करणाऱ्या भोंदू बाबाला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात घेतलं (Nashik News)आहे. या भोंदू बाबाची कसून चौकशी सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात गोणी आढळल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran: शक्य तितक्या लवकर इराण सोडा, युद्धविरामानंतर केंद्र सरकारकडून भारतीयांना सूचना जारी; नेमकं काय म्हणाले?

Viral Video: बनाना राइड करताना भयंकर अपघात, पर्यटक उंच उडून समुद्रकिनाऱ्यावर पडले; थरारक VIDEO व्हायरल

Ramai Awas Yojana: या नागरिकांना मिळणार हक्काचं घर, सरकार करणार खर्च; काय आहे रमाई आवास योजना?

Water Bottle Cap Colour Meaning: काळा, निळ्या की लाल, कोणत्या बाटलीच्या झाकणातील पाणी आरोग्यासाठी बेस्ट?

Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनच्या बर्थडे सेलिब्रेशनला मोठा राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO

SCROLL FOR NEXT