Nashik ATS Saam Tv
क्राईम

Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; टेरर फंडिंग करण्याप्रकरणी उच्चशिक्षित व्यक्तीला अटक

Nashik ATS : हुजेफ शेख इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग करत होता. तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप एटीएसने केलाय. आरोपीच्या तपासात अधिकची माहिती समोर येणार असल्याचा अंदाज आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

Nashik ATS Arrest One Person In Terror Funding :

भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून एकाला अटक करण्यात आलीय. तिडके कॉलनी परिसरात एटीएसने अटकेची कारवाई केलीय. एटीएसने अटक केलेल्या व्यक्तीचं नाव हुजेफ शेख असं आहे. दरम्यान विशेष एटीएसच्या न्यायालयाने आरोपी शेखला ३१ जानेवारीपर्यंत ATS कस्टडी पाठवण्याचे आदेश दिलेत.(Latest News)

हुजेफ शेख इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग करत होता. तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप एटीएसने केलाय. आरोपीच्या तपासात अधिकची माहिती समोर येणार असल्याचा अंदाज आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हुजेफ शेख हा आरोपी उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार आहे. शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथकं रवाना झाली आहेत. एटीएस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ७ मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह मिळून आली आहेत. संशयित शेख इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आरोप एटीएसने केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT