Crime News Saam Tv
क्राईम

Nandurbar Crime: नवीन पोलीस अधीक्षकांना चोरट्यांचं आव्हान; एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोड्या, 25 लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Houses Robbing In Pusnad

शहादा तालुक्यातील पुसनद (Nandurbar) या गावात एकाच रात्रीतून तब्बल पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. (Crime News In Marathi)

घरात (Pusnad) असलेले पाच तोळ्याची सोनसाखळी, तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या आणि दोन तोळ्याच्या साखळ्या असा एकूण पंधरा तोळ्यांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला (robbery) आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिसरात भीतीचं वातावरण

चोरट्यांनी केलेल्या या घरफोडींमुळे (crime news) संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे. घर चालवण्यासाठी सांभाळून ठेवलेले पैसे चोरीला गेल्याने अनेक महिलांना यावेळी अश्रू अनावर झाले होते, तर चोर शोधून काढण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. सारंखेडा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गावात (Pusnad) गुरूवारी रात्री एकाच भागात पाच ठिकाणी बंद घरं फोडण्यात आलेत. यामुळं नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ पसरली (Nandurbar) आहे. या पाचही घरफोड्यांमध्ये सुमारे 25 लाखांचा ऐवज लांबवण्यात आलाय.

नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

शहादा तालुक्यातील पुसनद (Pusnad) येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी झाली. यात जवळपास २५ लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. गावात प्रथमच अशा प्रकारे चोरीची घटना (Crime news) घडल्यामुळं गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

यादरम्यान श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या गावात (Nandurbar) भेट दिलीय. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT