Crime News Saam Digital
क्राईम

Nandurbar Crime : रस्त्याशेजारील नाल्यात आढळला युवकाच्या मृतदेह; नंदूरबारमधील खळबळजनक घटना

Crime News : रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीये. तसेच मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आह.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे, नंदूरबार

नंदूरबारमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीये. तसेच मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आह.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात हा मृतदेह पडला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय साधारण ३५ वर्षे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे याबाबत अद्याप काहीच ओळख पटली नाहीये. पोलीस त्याची ओळख पटण्यासाठी तपास करत आहेत.

मृतदेहाजवळ फक्त एक मोबाईल फोन पोलिसांना सापडलाय. आता फोन कोणाचा आहे? या व्यक्तीने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला या सर्वच प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आलीये. सफाई कामगार सफाईसाठी तेथे पोहचल्यावर त्यांना एक व्यक्ती नाल्यात पडल्याचा दिसला. त्यांनी आजुबाजूच्या व्यक्तींना बोलावले नीट पाहिले असता सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजलं.

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पोलीस तपास सुरू

काल डोंबिवली पश्चिमेतील बावन्न चाळीतील रेल्वे ग्राउंड परिसरात देखील एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही महिला कोण आहे? तिचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. अहवाल आल्यानंतरच तीच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

महिलेचे वय ५० ते ५२ दरम्यान असून कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने दोन दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सुमसान जागा असल्याने एक व्यक्ती लघुशंकेसाठी तेथे आला आणि त्याने मृतदेह बघितला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. याची नोंद विष्णुनगर पोलिस ठाण्यात केली असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT