Nandurbar Loksabha: नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्का देणार? ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता; रजनी नाईक यांनी अर्ज घेतल्याने रंगल्या चर्चा

Loksabha Election 2024: शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवार बदलण्यात येईल की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Loksabha Election 2024:
Loksabha Election 2024:Saamtv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २० एप्रिल २०२४

नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी प्रत्येकी चार अर्ज घेतल्याने शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवार बदलण्यात येईल की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्याआधी नंदुरबारमधून माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. या दौघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यताही पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात होती. मात्र काँग्रेसने ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

अशातच काँग्रेससाठीच आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी देखील प्रत्येकी चार अर्ज घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी नवा धक्का देणार की काय, याबाबत चर्चा रंगु लागली आहे.

Loksabha Election 2024:
Sharad Pawar Speech : मोदींचे भाषण ऐकल्यावर भाजपचे पंतप्रधान वाटले; शरद पवारांची टीका

दरम्यान, काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी रजनी नाईक यांनाच मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. तसेच के. सी. पाडवी यांनीही उमेदवारीच्या माघारीपर्यत कोणाच्या उमेदवारीचे काहीच खरे नसते, असे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलली जाणार की काय? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

Loksabha Election 2024:
Ajit Pawar: मोठी बातमी! अजित पवारांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर; नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com