छत्रपती संभाजीनगर :
'छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यापूर्वी नरेंद्र मोदींचे भाषण ऐकत होतो. पंतप्रधान हा देशाचा असतो. मात्र, भाषण ऐकल्यावर असे वाटले की, ते भाजपचे पंतप्रधान आहेत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
शरद पवार आज शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला हजेरी लावली. तसेच उमेदवार चंद्रकांत खैरे, जालनाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेदरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
>> देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर आणाया पाहिजे, यासाठी देशपातळीवर आघाडी केली. त्यासाठी पक्ष, खासदार नेते एकत्र आले.
>> कधी नेहरू कधी राहून गांधींवर टीका करणे हे सुरू आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर तुम्ही काय केले हे सांगितले पाहिजे.
>> माझ्या हातात सत्ता द्या ५० दिवसांत महागाई कमी करू म्हणाले, पण त्या कमी करण्याऐवजी वाढल्या. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या. देशात आज बेकारांची संख्या वाढली. १०० पैकी शाळा कॉलेजमधून मुले बाहेर पडतात, त्यापैकी ८७ मुले बेकार असल्याचे सर्वेक्षण आहे.
>> आज शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. फळबाग योजना आम्ही सुरू केली होती, आज पाणी नसल्यानं त्या फळबागा जळत आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान मंत्री ढुंकूनही बघत नाहीत.
>> राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची यत्किंचितही चिंता नाही. सत्तेचा गैरवापर करण्यासाठी हे सत्ता वापरतात.
>> आज मूलभूत अधिकार संकटात आले आहेत. संसदीय लोकशाही संकटात आली आहे. पंतप्रधानाच्या विरोधात बोलले म्हणून एक आदिवासी राज्यातील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली.
>>दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. टीका केली तर राज्यकर्ते तुरुंगात टाकतात. लोकशाही वाचवण्यासाठी, मूलभूत हक्कासाठी आपल्याला उत्तर द्यावे लागेल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.