Kinwat Telangana police attack theft accused escape news saam tv
क्राईम

Crime News: आरोपीला घेऊन जाताना पोलिसांवरच हल्ला; गाडी फोडली, हातकडीसह आरोपी फरार!

Attack On Telangana Police: नांदेडच्या किनवट तालुक्यात चोरीच्या आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. दगडफेकीत पोलिसांची गाडी फोडण्यात आली आणि हातकडीसह आरोपी पसार झालाय.

Bharat Jadhav

  • आरोपीला घेऊन जाणाऱ्या तेलंगणा पोलिसांवर हल्ला

  • किनवट-आदिलाबाद मार्गावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांचे वाहन अडवल्याची माहिती

  • हल्ल्याचा फायदा घेत आरोपी शेख बखार हातकडीसह पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून घेऊन जाताना तेलंगणा पोलिसांवर हल्ला करण्यात आला.किनवट-आदिलाबाद मार्गावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवून हल्ला केला.पोलिसांची गाडी फोडण्यात आली. दगडफेकीचा फायदा घेऊन हातकडीसह आरोपी जंगलात पसार झाला.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून घेऊन जाताना तेलंगणा पोलिसांवर हल्ला करण्यात आला.किनवट-आदिलाबाद मार्गावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवून हल्ला केला.पोलिसांची गाडी फोडण्यात आली. दगडफेकीचा फायदा घेऊन हातकडीसह आरोपी जंगलात पसार झाला.

शेख बखार याला अटक करून तेलंगणा पोलिसांची गाडी परतीच्या मार्गावर निघाली.मात्र चिखली गावाजवळच्या रस्त्यावर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवली. पोलिसांच्या गाडीवर हल्ला करत दगडफेक करण्यात आली.त्यातून आरोपी शेख बाखर हा हातकडीसह फरार झाला अशी माहिती आहे.दरम्यान सध्या तेलंगणा पोलिसांचे पथक किनवट पोलीस स्थानकात दाखल झाला असून , याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांच्या नावाने ज्वेलर्सकडून ४ लाख रुपये खंडणी उकळली

पोलिसांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणी दोन जणांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली. संजय प्रसाद आणि तेजस सरवदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी एका ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून पोलिसांना मॅनेज करण्याच्या नावाखाली तब्बल ४ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. यानंतर एका पान टपरी चालकाला धमकावत त्याच्याकडूनही ७ हजार रुपये घेतल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत धूसफूस? मंत्रिपदावरून बड्या नेत्याची नाराजी, राजकीय वर्तुळात खळबळ

गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! 'या' चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत DJ-स्पीकर वाजवण्याची परवानगी

शिंदेंचा कार्यक्रम घेतला तर धिंगाणा होईल; जरांगेंचा शिंदेसेनेच्या खासदाराला थेट इशारा

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव गाडीनं आधी दोघींना उडवलं, नंतर कार 25 फूट खड्ड्यात उलटली

कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी; महामार्गावर अपघाताचा थरार

SCROLL FOR NEXT