mumbai Crime News Saam tv
क्राईम

Nanded Crime: दहीहंडीत वाद, दुसऱ्या दिवशी राडा, भरचौकात तरुणाला संपवलं; नांदेड शहर हादरलं!

Nanded Breaking News: घटनेनंतर दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी वैभव दुधाटे यास मृत घोषित केले तर गंभीर जखमी कृष्णा मुळे याच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. ७ सप्टेंबर

Nanded Crime News: राज्यभरात एकीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु असतानाच नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहिहंडी दिवशी झालेल्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना शहरातील राज कॉर्नर परिसरात घडली. या राड्यामध्ये एकाचा भोसकून खून करण्यात आला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भयंकर घटनेने नांदेड शहर हादरुन गेले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड शहरातील तरोडा भागात गुरुवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीच्या उत्सवादरम्यान तेव्हा दोन गटात वाद झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पुन्हा हे दोन्ही गट राज कॉर्नर परिसरात आमने-सामने आले त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटांकडून एकमेंकावर जीवघेणे हल्ला करण्यात आला.

यावेळी वैभव दुधाटे व कृष्णा मुळे या तरुणावर खंजिराने वार करण्यात आले, ज्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी वैभव दुधाटे यास मृत घोषित केले तर गंभीर जखमी कृष्णा मुळे याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एकीकडे पुणे शहरातील वनराज आंदेकरच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच नांदेडमधील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भरवस्तीत झालेल्या या घटनेने शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT