Nalasopara Crime News: saam Digital
क्राईम

Nalasopara: चाळीतल्या बंद खोलीत आढळला आठ वर्षीय मुलीचा मृतदेह; 3 दिवसांपासून होती बेपत्ता

Crime News: खळबळजनक! चाळीतल्या बंद खोलीत आढळला मुलीचा मृतदेह; आठ वर्षीय चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?

Ruchika Jadhav

Nalasopara News:

नालासोपारा (Nalasopara) शहरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समरो आली आहे. सोमवारी सकाळी एका बंद खोलीत ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आलाय. एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत प्लास्टिकच्या गोणीत मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुलगी वसई फाटा येथील वाण्याचा पाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. शनिवारी १ डिसेंबर रोजी ती शाळेतून (School) घरी आली. घरी आल्यावर तिने एक आयस्क्रिम खाल्ल. त्यानंतर कपडे बदलून ती मित्रांसह बाहेर खेळण्यासाठी गेली. बराच उशिर झाला तरी ती घरी परतली नाही.

आपली मुलगी कुठे गेली यासाठी कुटुंबियांची शोधाशोध सुरू झाली. चाळीतल्या सर्व घरांमध्ये तिचा शोध घेतला. रात्र झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबियांच्या मनातली भीती वाढू लागली आणि त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी संपूर्ण शहरात मुलीचा शोध सुरू ठेवला. सोमवारी अचानक मुलगी राहत असलेल्या चाळींच्या शेजारील चाळीतील ५ नंबर खोलीतून कुजलेला वास येऊ लागला. दुपारनंतर कुजलेला वास आणखी वाढू लागला. काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच चाळीतील काही व्यक्तींनी या खोलीचे दार उघडले. त्यावेळी समोर जे दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलीच्या कुटुंबियांना ही माहिती मिळताच त्यांनीही त्या खोलीत धाव घेतली. गेल्या ३ दिवसांपासून आपली मुलगी बेपत्ता आहे. मात्र ती आपल्याच शेजारच्या चाळीत मृत्यूशी झूंज देत असेल याची कुटुंबियांना काहीच कल्पना नव्हती. मुलीसोबत नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू कसा झाला? हा घातपात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT