Crime news Saam Tv
क्राईम

Crime News : नागपूर हादरलं! ११ वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या, झुडपात आढळला मृतदेह

Nagpur Crime News : नागपूरच्या खापरखेडा परिसरात ११ वर्षीय जितू सोनेकर याची खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली. झुडपात सापडलेला मृतदेह पाहून गाव हादरलं असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  1. नागपूरच्या खापरखेडा परिसरात ११ वर्षीय जितू सोनेकर याची हत्या झाली.

  2. जितूचा मृतदेह झुडपात सापडला असून गळा आवळल्याचे निष्पन्न.

  3. आरोपींनी खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याचे उघड.

  4. पोलिसांनी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा यांना अटक केली आहे.

नागपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. खापरखेडा परिसरातील चनकापूर येथे बुधवारी सकाळी ११ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. मृत मुलाचे नाव जितू युवराज सोनेकर (वर्षे ११). धक्कदायक म्हणजे या अपहरणामागे खंडणी मागण्याचा हेतू असल्याचं समोर आलं आहे. मात्र खंडणी मागण्याच्या तयारीत असलेल्या नराधमांनी निरपराध मुलाचा जीव घेतला आहे. या घटनेत सामील असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जितू सोनेकर हा मुलगा १५ सप्टेंबर रोजी शाळेसाठी घरातून निघाला. मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतला नाही. जितू घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र जितू सापडला नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गावात शोध घेतला मात्र थांगपत्ता लागलाच नाही.

अखेर आज चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलांचा शाळेच्या गणेश घातलेला लहान मुलांचा मृतदेह झुडपात आढळला. क्षणाचाही विलंब न करता गुराख्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकाने देखील पाहणी केली. पोलिसांच्या प्रथमिक तपासात जितूचा गळा आवळून हत्या केल्याच स्पष्ट झालं आहे.

धक्कादायक म्हणजे पोलिसांनी खोलवर लक्ष केल्यावर त्यांना समजले, जीतूचे वडील यांना शेत विकल्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या तरुणांना मिळाली. त्यामुळे जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र जितूला अपहरण केल्यानंतर जितूने आरोपींना प्रश्न विचारल्याने त्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. आणि शेजारील झुडपात मृतदेह फेकला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान या घटनेतील गुन्हेगारांना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT