नागपूर की वासेपूर?, पाहा हा धक्कादायक प्रकार,पाहा व्हिडिओ  Saam TV
क्राईम

Nagpur Crime : नागपूर की वासेपूर, भाजीच्या ठेल्यावरुन खुलेआम गोळीबार

Nagpur Crime News : नागपूरात खुलेआम गोळीबार झाल्याची घटना घडलीय.. मात्र त्याचं कारण काय? नागपूरची ओळख क्राईम कॅपिटल का बनत चाललीय?

Bharat Mohalkar

Nagpur Crime News : भाजीच्या ठेल्यावरुन ही खुलेआम फायरिंग गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटातील नाही... तर ही दृश्य आहेत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील....आणि या गोळीबाराला कारण ठरलंय भाजीचा ठेला लावण्यावरुन झालेला वाद..... नागपूरच्या गोधनी परिसरातील भर बाजारात गोळीबार करत चॉपरने एकाची हत्या करण्यात आली..या गोळीबारात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय.. तर एक ग्राहक जखमी झालाय.. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली...

या गोळीबारानंतर काही तरुणानी घोषणाबाजी करत दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.. तर मेयो हॉस्पिटल परिसरात लोकं जमल्याने जणाव निर्माण झाला होता...यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवत 3 जणांना ताब्यात घेतलं तर एक जण फरार आहे....मात्र नागपूरमधील ही पहिलीच हत्येची घटना नाही.. तर अवघ्या तीन महिन्यात 20 हत्या झाल्यानं हे नागपूर की वासेपूर असा प्रश्न निर्माण झालाय...

जानेवारी ते मार्च दरम्यान 2 हजार 534 गंभीर गुन्ह्यांची नोंद

महिन्याला सरासरी 833 गुन्ह्यांची नोंद

2023 मध्ये वर्षभरात 9 हजार 999 गुन्हे

2024 मध्ये बलात्काराच्या अडीचशे घटनांची नोंद

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी... मात्र आता नागपूरची ओळख गुन्हेगारीचं शहर अशी व्हायला लागलीय.. त्यातच नव्या वर्षात नागपूर शहरावर दंगलीचा शिक्का बसला.. एवढंच नाही तर चोरी, विनयभंग, बलात्कार आणि हत्यांचा सिलसिला सुरुच आहे.. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूरमध्ये गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी ठोस भूमिका घ्यायला हवी.. अन्यथा गुन्हेगारांचा नंगानाच नागपूरची इभ्रत वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT