Nagpur Jaripatka young man was killed Saam Tv News
क्राईम

Nagpur Crime : दुचाकीनं चायनीजच्या टपरीवर जाताना अडवलं, जुन्या रागातून टोळक्याने संपवलं; नागपुरात खळबळ

Nagpur Crime News : स्वप्नील गोसावी याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. यात भूपेश वंजारी आणि रवी बॅनर्जी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.

Prashant Patil

पराग ढोबळे, साम टिव्ही

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या परिसरात घडलेली आहे. एका तरुणाची क्षुल्लक कारणातून हत्या केल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे. स्वप्निल गोसावी (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो नारा परिसरात वास्तव्यास होता. यात मृतक स्वप्निल हा चायनीजच्या टपरीवर जात होता. यावेळी जुन्या वादातून दुचाकीने जाताना भुपेश आणि रवींच्या साथीदार यांनी त्याला बेदम मारहाण केली.

स्वप्नील गोसावी याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. यात भूपेश वंजारी आणि रवी बॅनर्जी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. जरीपटका पोलिसांनी स्वप्नीलच्या पत्नीच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडूपमधल्या मुलीच्या आत्महत्येत मोठा खुलासा

भांडुप परिसरातील बहुमजली इमारतीच्या टेरेसवरून पडून १५ वर्षांच्या मुलीचा २३ जून रोजी मृत्यू झाला होता. या मुलीनं अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचं तिच्या मित्राने पोलिसांना सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात या मुलीला मित्रानेच धक्का दिल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करणार असून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीच मानसिक तणावात होता. या काळात त्याच्या एका मित्राने त्याची चेष्टा केल्याने तो अधिक अस्वस्थ झाला. अशा मनःस्थितीत असतानाच त्याच्या मैत्रिणीने त्याला भेटण्यासाठी त्याच बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले होते.

तेथे दोघांमध्ये बोलणे सुरू असताना दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून दिलं. त्यात या मैत्रिणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास भांडूप पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसला हादरा! शिंदेसेनेच्या गळाला लागला मोठा मासा; शेकडो पदाधिकाऱ्यांसह 'धनुष्यबाण' घेणार हाती

Mumbai : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Lack of sleep: 8 तासांपेक्षा कमी झोप घेताय? हे गंभीर आजार होण्याचा वाढतो धोका

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT