Property Dealer Killed Saam Tv
क्राईम

Nagpur Crime News: पैशांपुढे मैत्री हरली! क्रिकेट सट्टेबाजीवरुन वाद; मित्रांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nagpur Crime Property Dealer Killed: नागपुरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. आता एका प्रॉपर्टी डीलरची हत्या झाल्याची घटना घडली आहे. त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Property Dealer Killed In Money Dispute

पैशांच्या व्यहारातून देखील लोकांमध्ये भांडणं होत असल्याच्या घटना नेहमीच घडतात. अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. योजना करून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचं समोर आलं आहे. (latest crime news in marathi)

नागपुरात पैशाच्या वादातून (Money Dispute) सुपारी घेऊन प्रॉपर्टी डीलरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी मृतदेह कारमध्ये टाकून पळून गेले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना चंपा परिसरातील आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालत्या कारमध्ये हत्या

चंपा परिसरात चालत्या कारमध्ये तीन जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर ते तेथून पळून गेले. हे प्रकरण क्रिकेट सट्टेबाजेशी संबंधित असल्याचं समोर येतंय. मृत तरूण प्रॉपर्टी डिलर (nagpur crime) होता.

आदित्य बोंद्रे यांची हत्या सचिन फेदरकर (३७ वर्ष), रोशन बोकडे ( ३५ वर्ष) आणि मृणाल भोयल (२६ वर्ष) यांनी केल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिघांनाही २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हत्येची योजना आखली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी ही हत्या एसयूव्ही कारमध्ये केली. आदित्य आणि सचिन दोघेही क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे गुंतवत असत. यावेळी त्यांच्यात पैशांवरून वाद (Money Dispute) झाला. त्यानंतर सचिनने आदित्यच्या हत्येची योजना आखली. यासाठी रोशन आणि मृणालला सुपारी दिली होती.

ठरलेल्या योजनेनुसार सचिनने आदित्यला भेटायला बोलावले. चौघेही एसयूव्ही कारमध्ये बसले. सचिन आणि आदित्य यांच्यात पैशांवरूनही वाद झाला होता. त्यानंतर सचिन, रोशन आणि मृणाल यांनी आदित्यला चालत्या कारमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर आदित्यचा मृतदेह गाडीत टाकून ते पळून (nagpur crime) गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना आदित्यचा मृतदेह कारमध्ये सापडल्यानंतर तपास सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT