Nagpur Breaking News:
Nagpur Breaking News:  Saamtv
क्राईम

Nagpur Crime: तिकीटावरुन वाद.. धावत्या बसमध्ये प्रवाशाचा कंडक्टरवर चाकू हल्ला; नागपुरमधील घटना

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २७ एप्रिल २०२४

नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये वाचकावर एका प्रवाशाने चाकू हल्ला करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीटावरुन वाद झाल्याने प्रवाशाने बस कंडक्टरला मारहाण केली. या मारहाणीत बस कंडक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये एका प्रवाशाने कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. फिरोज शेख असे हल्ला केलेल्या प्रवाशाचे नाव असून योगेश काळे असे जखमी बस वाहकाचे नाव आहे. तिकीटावरुन झालेल्या वादातून ही घटना घडली.

बस नागपूरवरुन निघाल्यानंतर कोंढाळी दरम्यान फिरोज आणि वाहक योगेश काळे यांच्यात तिकीटावरुन वाद झाला. योगेश काळे याने तिकीट दाखव असे म्हटले मात्र फिरोज तिकीट दाखवत नसल्यानं गोंधळ वाद झाला. याच वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि फिरोजने चाकू काढून योगेश काळे याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, या घटनेनंतर बसमधील प्रवाशांनी हल्लेखोराला पकडले. तसेच बस चालक संतोष जाधव यांनी बस पोलीस ठाण्यात घेतली. या हल्ल्यात योगेश काळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर कोंढाळी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी फिरोज शेखला अटक करण्यात आली असून कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राेहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता : अमाेल मिटकरी

Relationship Tips : पूर्वीच्याकाळी २० ते २५ जणांचं कुटुंबं आनंदाने एकत्र कसं राहायचं? वाचा कारणे

Anil Ambani Lok Sabha Voting | अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Maharashtra Lok Sabha Voting Live: पवईत मतदार केंद्रात दोन तासांपासून लांबच लांब रांगा; अभिनेता आदेश बांदेकरही रांगेत

Mumbai Loksabha Voting: ओशिवरामध्ये भाजप-ठाकरे गट आमनेसामने, मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT