Nagpur Crime News  Saamtv
क्राईम

Nagpur Crime: धक्कादायक! पोलीस स्टेशनच्या आवारात सहाय्यक आयुक्तांच्या वाहन चालकावर कुऱ्हाडीने हल्ला; नागपुरातील घटना

Nagpur News: यावेळी आरडाओरडा केल्यानंतर इतर सहकारी पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १६ मार्च २०२४

Nagpur Crime News:

नागपुर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता नागपुरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रफुल जगदेवराव धर्माळे हे पोलीस कर्मचारी सहाय्यक आयुक्तांचे वाहनचालक आहेत. आज (१६, मार्च) सकाळी त्यांनी पोलीस आयुक्तांना स्टेशनच्या आवारात सोडले आणि त्यानंतर गाडी साफ करत होते. याचवेळी आरोपीने अचानक लोखंडी कुऱ्हाडीने प्रफुल धर्माळे यांच्यावर वार केले.

सुरूवातीला लक्ष नसल्याने दोन घाव बसले, मात्र तिसरा वार त्यांनी हुकवला. यावेळी आरडाओरडा केल्यानंतर इतर सहकारी पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, दिलीप चुनकरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव असून प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं बोलले जात आहे. चक्क कपिलनगर पोलीस स्टेशनच्या आवारातच ही गंभीर घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT