Nagpur Crime Saam tv
क्राईम

Nagpur Crime: नागपूर हादरले! कौटुंबिक वाद टोकाला गेला, तिघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Nagpur Crime: नागपूरमध्ये तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More
  • नागपूरच्या धापेवाडा येथे संतापजनक घटना घडली

  • कौटुंबिक वादातून तिघांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले

  • दोन तरुणींसह तिघे किरकोळ जखमी झाले

  • सावनेर पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली

नागपूरमध्ये तिघांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील धापेवाडा येथे ही संतापजनक घटना घडली. दोन तरुणींसह तिघांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. - जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांवर आणि घरात कामासाठी आलेल्या दोन तरुणीना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकावर तसेच घरात कामासाठी आलेल्या दोन तरुणींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. सावनेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. धनराज देवनाथ चरवड यांच्या तक्रारीवरुन आरोपी राजू लक्ष्मण बरबड याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

धनराज चरवड यांच्या तक्रारीनुसार, २९ जून रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास त्यांचा नातेवाईक राजू लक्ष्मण बरबड (४८ वर्षे) हा सोमवारी घरी त्यांच्या घरी आला. जुन्या कारणावरून त्याने भांडण सुरू केले. या वादातून संतप्त झालेल्या राजूने धनराज बरवड तसेच घरात कामासाठी आलेल्या दोन तरुणींच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने या घटनेत तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरण पोलिसांनी तात्काळ आरोपी राजूविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. या घटनेचा पुढील तपास सावनेर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT