Gold Smugglling Instagram
क्राईम

Nagpur Crime: परदेशी तस्कराला नागपूर विमानतळावर अटक; जीन्स पॅन्ट, बनियानमध्ये लपवलं होतं ५ कोटी रुपयांचं सोनं

Bharat Jadhav

Nagpur Crime Airport Gold Smugglling :

शारजाहून एअर अरेबिया एअरवेजच्या फ्लाइटमधून आलेल्या एका परदेशी प्रवाशाला नागपूर कस्टम विभागाने अटक केलीय. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा सोन्याची तस्करी करत होता. त्याच्याकडे ८२२ ग्रॅम सोने आढळून आले आहे. जीन्स पॅन्ट आणि बनियानमध्ये सोने लपवल्याचं पाहून कस्टम अधिकारीदेखील चक्रावले. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हा परदेशी प्रवाशी शारजाहून एअर अरेबियाच्या विमानातून नागपूरमध्ये आला होता. हा परदेशी प्रवाशी नागपूर विमानतळावर आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्या हालचालीवर संशय आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अडवलं आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे ८२२ ग्रॅम सोने आढळून आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोने लपवण्याची त्याची आयडिया पाहून कस्टम अधिकारी चक्रावले. या तस्कराने आपल्या बनियान आणि जीन्सच्या पॅन्टमध्ये पेस्ट बनवून सोने लपवले होते. अधिकाऱ्यांनी बनियान आणि पॅन्ट फाडल्यानंतर सोन्याची पेस्ट बाहेर काढली. दरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाकडून सोन्याची पेस्ट, केशर, आयफोन आणि स्मार्ट घड्याळे जप्त केली आहेत. अटकेत असलेल्या प्रवाशी कोण आहे , याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या सोने तस्करी प्रकरणातील पुढील तपास चालू असल्याची माहिती कस्टम विभागाचे आयुक्तांनी दिलीय.

डीआरआयची मोठी कारवाई

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबईत मोठी कारवाई केली. तस्करी करून आणलेल्या सोन्याची खरेदी विक्री करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जागेची 5 मार्च 2024 रोजी तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना तेथे परदेशी बनावटीचे मुख्यतः विटांच्या स्वरूपातील 10.7 किलो सोने, तसेच सोने तस्करीच्या विक्री व्यवहारांतून मिळवलेली 1.8 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

मिळालेल्या अधिक माहितीवरुन, 5 मार्च 2024 रोजी टोळीच्या प्रमुखाच्या घरी शोधमोहीम राबवण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले. पथकातील अधिकाऱ्यांना पाहून त्या माणसाने 14 व्या मजल्यावरील त्याच्या निवासस्थानातून संशयास्पद वस्तू फेकून देण्यात यश मिळवले.

चौकशीदरम्यान, टोळीच्या प्रमुखाने सांगितले की त्याने त्याचे फोन आणि परदेशी बनावटीच्या सोन्याच्या दोन विटा फेकून दिल्या. सुमारे 15 तासांची शोधमोहीम आणि पाठपुरावा केल्यानंतर 6 मार्च 2024 रोजी प्रमुखाच्या सोसायटीला लागून असलेल्या दोन सोसायट्यांमधील दोन रहिवाशांकडून टोळी प्रमुखाच्या मालकीचे 3 मोबाईल फोन आणि प्रत्येकी 1 किलो वजनाच्या 2 सोन्याच्या विटा ताब्यात घेण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT