Nagpur Crime Saam tv
क्राईम

Nagpur Crime: नागपूर हादरले! वृद्ध महिलेवर बलात्कार, नंतर अमानुष मारहाण करत जागीच संपवलं

Nagpur Police: नागपूरमध्ये वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे.

Priya More
  • नागपूरमध्ये वृद्ध महिलेवर बलात्कार

  • अमानुष मारहाण करत हत्या

  • आरोपीला ९ व्या दिवशी पोलिसांकडून अटक

  • या घटनेमुळे नागपूर हादरले

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे ही घटना घडली. आरोपीने वृद्ध महिलेवर आधी बलात्कार केला. त्यानंतर अमानुष मारहाण करत तिला संपवण्यात आले. या प्रकरणाचा ९ दिवसानंतर उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. ९ दिवसांनंतर या हत्याकांडाची घटना समोर आली. घटनेचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकण्यात सावनेर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने बोखारा येथून ताब्यात घेतले. तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

गंगाबाई असे मृत महिलेच्या हातावर गोंधलेले नाव आहे. मात्र तिची वास्तविक ओळख अद्याप पटली नाही. सुधाकर बाबाराव मंडपे (४८ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. तो ब्राम्हणवाडा येथील रहिवाशी आहे. सावनेर येथे बांधकाम कामगार म्हणून करत होता. २७ जूनच्या रात्री दहेगाव रंगारी येथील नागपूर - सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोड परिसरात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. अत्याचार करून आरोपीने वृद्ध महिलेला अमानुष मारहाण केली. ज्यामुळे पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT