Nagpur Crime  Saam Tv
क्राईम

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

Nagpur Crime: नागपूरमध्ये सासऱ्याने सुनेची हत्या केली. कुऱ्हाडीने वार करत सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Priya More
  • नागपूरमध्ये जादूटोण्याच्या संशयातून हत्याकांडाची घटना

  • सासऱ्याने सुनेची हत्या केली

  • कुऱ्हाडीने वार करत सुनेला जागीच संपवलं

  • सुनेच्या हत्येनंतर सासऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत सुनेची हत्या केली. मुलावर जादुटोणा केल्याच्या संशयावरून सासऱ्याने सुनेसोबत हे भयंकर कृत्य केले. सुनेची हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागपूर हादरले. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलावर जादूटोणा करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेची हत्या केली. सुनेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या करून सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

लक्ष्मी रविशंकर पाली (४२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. तर नथुलाल भगवान पाली (७० वर्षे) असं आरोपी सासऱ्याचे नाव आहे. हत्या झालेल्या लक्ष्मी यांच्या नवऱ्याचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर मुलावर जादूटोणा केल्याचा संशय घेत नथुलाल यांचा सुनेसोबत वारंवार वाद होत होता. या वादातूनच ही हत्याकांडाची घटना घडली.

नेहमीप्रमाणे आज दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. टोकाच्या भांडणादरम्यान नथुलालने कुऱ्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात लक्ष्मी गंभीर जखमी झाल्या. जास्त रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. सूनचे हत्या केल्यानंतर नथुलाल यांनी विहिरीत उडी घेतली. नागरिकांनी त्याला बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल केले. आरोपीची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार-नालासोपारा जाणाऱ्या रस्त्यावर गणेश मंडळाची गणेशमूर्ती कोसळली

राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

15 सप्टेंबरला जरांगे अंतरवालीतून निघणार, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर धडकणार

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT