Crime Saam Tv
क्राईम

Borivali crime : बोरीवली हादरली! कामावर जाताना, नराधमाने वाटेतच डाव साधला, पूलाखाली ओडले अन्....

woman assaulted under Borivali bridge Mumbai : मुंबईत बोरीवली परिसरात २९ वर्षीय महिलेसोबत पुलाखाली छेडछाड आणि लुटमारीची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक करत सोनं व मोबाईल जप्त केला.

Namdeo Kumbhar

  • बोरीवली (पश्चिम) येथे २९ वर्षीय महिलेसोबत पुलाखाली छेडछाड आणि लुटमारीची घटना घडली.

  • महिलेनं आरडाओरड करून आरोपीपासून सुटका केली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.

  • पोलिसांनी तात्काळ विशेष पथक स्थापन करून आरोपी संजय राजपूतला काही तासांत अटक केली.

  • आरोपीकडून महिलेचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि हेडफोन मिळून सुमारे ₹५२,००० किमतीचा माल जप्त करण्यात आला.

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Mumbai Borivali Crime news Update : कामावरून घरी जाणाऱ्या २९ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळ घडली आहे. बोरीवली पश्चिम परिसरात सोमवारी संध्याकाळच्या वेळी महिला कामावरून घरी निघाली होती. त्यावेळी सुधीर फडके पुलाखाली त्या महिलेले बळजबरी नेत नराधमाने विनयभंग केला. महिलेने आरडाओरड करून आपली सुटका केली. त्या नराधमाने तिचा मोबाईल आणि सोनं लंपास केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ तपास करत काही तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

बोरीवली (पश्चिम) परिसरात सोमवारी सायंकाळी एका २९ वर्षीय महिलेसोबत छेडछाड आणि लुटमारीची धक्कादायक घटना घडली. महिला कामावर जात असताना सुधीर फडके पुलाखालील निर्जनस्थळी एका युवकाने तिला ओढून नेले आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रचंड ताकदीने प्रतिकार केला पण काहीच उपयोग झाला नाही.

आपले प्राण वाचवण्यासाठी घाबरलेल्या महिलेने आपले सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन आरोपीला देऊन तिथून पळ काढला आणि थेट बोरीवली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर झोन ११ चे उपायुक्त संदीप जाधव यांनी तातडीने विशेष पथक स्थापन केले. रात्रीभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक करण्यात यश मिळवले.

आरोपीची ओळख संजय राजपूत (दहिसर रहिवासी) अशी झाली असून तो हॉटेलमध्ये भांडी धुणे आणि रस्ते साफ करण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून महिलेचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि हेडफोन मिळून सुमारे ₹५२,००० किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणाच्या तपासाची पुढील प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: उरण ते खारकोपरदरम्यान लोकलसेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, नेमकं कारण काय?

Chennai News: बाईक थांबवली, पॅन्टची चेन काढली अन्...; पहाटे पाच वाजता महिलेसोबत घडलं भयंकर; VIDEO व्हायरल

Eye Dark Circle Remove Tips: डोळ्याखालची त्वचा काळी झालीये ? मग लगेचच करा हे ५ घरगुती उपाय

दहशतवादी पथकाची मोठी कारवाई; मुंब्र्यानंतर कुर्ल्यात छापेमारी, नेमकं काय सापडलं? VIDEO

Maharashtra Live News Update: दिल्ली स्फोटातील जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

SCROLL FOR NEXT