Mumbai News Saam Digital
क्राईम

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News : हेवी ड्युटी बांधकाम आणि डिमोलिशन मशिन आणि वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या २७ वर्षीय मुंबईतील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अलीकडेच दोघांना अटक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेवी ड्युटी बांधकाम आणि डिमोलिशन मशिन आणि वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या २७ वर्षीय मुंबईतील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अलीकडेच दोघांना अटक केली.एफआयआरनुसार, दोन व्यावसायिकांवर डिसेंबरमध्ये मुंबईतील वाकोला पोलिसांनी हेवी-ड्युटी कन्स्ट्रक्शन वाहन विकून 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर महाराष्ट्रातील बँक अधिकाऱ्यांनी हे वाहन जप्त केले होती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे व्यापारी अंगद सेठीच्या लक्षात आलं.

त्यांची फर्म बांधकाम मशीन आणि जेसीबी खरेदी आणि विक्री करते आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी पंकज सिंग या एका व्यक्तीसोबत व्यवसाय करार केला होता, असं अंगद सेठी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. सेठीच्या ओळखीच्या अनुज मिश्रा यांनी नंतर त्यांना कळवले की पाटणा येथील तीच कंपनी दुसरे बांधकाम वाहन विकत आहे. त्यांनी हे अवजड वाहन 77 लाख रुपयांना खरेदी केलं.

सेठी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी हे पैसे सिंग यांच्या फर्मला त्यांच्याकडून वाहन खरेदी करण्यासाठी हस्तांतरित केले. बांधकाम आणि पाडण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या वाहनावर कोणतीही थकबाकी नसल्याचे दर्शविणारे चलन नंतर दिले. मात्र, हे वाहन मुंबईच्या हद्दीतील सेठी यांच्या गोदामाकडे जात असताना, एका बँकेच्या वसुली पथकाने हे वाहन खालापूर टोल प्लाझा येथे ताब्यात घेतलं.

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंकज सिंग, सुबीर कुमार साहू आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३४ (सामान्य हेतू), १२० (ब) (गुन्हेगारी कट), ४०६ (भंग), 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या महिन्यात पोलिसांनी तपासाअंती त्यांना अटक केली होती. या दोघांनी नंतर वांद्रे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि नुकताच त्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने त्यांना फायनान्स कंपनीची सर्व थकबाकी भरण्यास सांगितले आणि 10 दिवसांच्या आत एनओसी जमा करण्याची सूचना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

Pankaj Bhadouria: प्रसिद्ध सेलिब्रिटी मास्टरशेफला ब्रेस्ट कॅन्सर; स्वत: पोस्ट करत दिली माहिती, मनोरंजनसृष्टीत खळबळ

Workplace etiquette: ऑफिसमध्ये या गोष्टी कधीच करू नये, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT