Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Massage Parlour Fraud : मसाजच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News : मुंबईतील उच्च न्यायालयातील वकिलाचा मसाजदरम्यान गुप्त व्हिडिओ बनवून लाखो रुपये उकळण्यात आले आहे. बोरीवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता.

Alisha Khedekar

मुंबईतील वकिलाचा मसाजदरम्यान गुप्त व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आलं आहे.

आरोपींनी सुरुवातीला ५० हजार आणि नंतर ६ लाख रुपयांची मागणी केली.

बोरिवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक फरार आहे.

तपासात अशा घटना इतर ग्राहकांबरोबरही घडल्याचं उघड झालं आहे.

मुंबईतील एका वकिलाला मसाज करण्याची हौस चांगलीच भोवली आहे. मुंबईतील उच्च न्यायालयाच्या वकिलाचा मसाजादरम्यान नग्न व्हिडिओ काढला. इतक्यावरच न थांबता गुन्हेगारांनी या वकिलाकडून लाखो रुपये उकळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुनहेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित आरोपींची नवे समीर अली हनीफ खान (वर्षे २१) आणि भूपेंद्र भगवान सिंग (वर्षे २५) अशी आहेत. अद्याप एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार वकिलाने मसाज सेंटर शोधून काढले. त्यानुसार त्याने आरोपी समीरला फोन करून मसाजसाठी अपॉइंटमेंट घेतली. मसाज दरम्यान भूपेंद्रने वकिलाचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर गुप्तपणे बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर तिघांनीही वकिलाला तो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र वकिलाने नकार दिला, तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण केली. बदनामी आणि हिंसाचाराच्या भीतीने वकिलाने ताबडतोब समीर अलीच्या गुगल पे अकाउंटवर ५० हजार रुपये ट्रान्सफर केले.

काही दिवसांनंतर, आरोपींनी सतत वकिलाला फोन करून ६ लाख रुपयांची मागणी केली, परंतु वकिलाने नकार दिला. त्यानंतर आरोपींनी लागोपाठ धमक्या देणारे फोन करण्यास सुरुवात केली. कॉलमुळे अस्वस्थ होऊन वकिलाने २३ सप्टेंबर रोजी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . तक्रार मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक मधुसूदन नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने समीर आणि भूपेंद्र यांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही त्यांचे गुन्हे कबूल केले.

पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार फक्त वकिलासोबत न घडता या मसाज सेंटर मध्ये आलेल्या प्रत्येकासोबत घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलीस या प्रकारच्या मुळाशी जाऊन तपास करत आहेत. तसेच आरोपींचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Tourism : ट्रेकिंग, ऐतिहासिक ठिकाण अन् शांत निसर्ग; सातपुडा पर्वतरांगेत वसलाय 'हा' किल्ला, पाहाल मनमोहक विहंगम दृश्य

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Nana Patekar Video : शाहिद-तृप्तीला उशीर, नाना पाटेकर वैतागून निघून गेले; 'O Romeo'च्या ट्रेलर लाँच दरम्यान नेमकं घडलं काय?

Aloo Tikki Recipe: नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी आलू टिक्की; ५ मिनिटांत होईल तयार

Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT