Fraud Case Saam tv
क्राईम

Dombivli Fraud Case: म्हाडात घर आणि रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देत ३४ लाखांचा गंडा; डोंबिवलीमध्ये धक्कदायक प्रकार उघड

Fraud Case:डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीला ३४ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन ३४.७८ लाखांची फसवणूक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dombivli Fraud News:

डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीला ३४ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन ३४.७८ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित व्यक्ती आणि त्याच्या बहिणीला म्हाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुतण्याला रेल्वेत नोकरी देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. याप्रकरणी अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

मिड डेच्या वृत्तानुसार, आरोपींनी २०१९ ते २०२१ या कालावधीत पीडित महिलेकडून तब्बल ३४ लाख ७८ हजार रुपये घेतले होते. परंतु पैसे देऊनही पीडित व्यक्तीला ना फ्लॅट ना पुतण्याला नोकरी मिळवून दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. पीडित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार, जयदीप लोंढे, शितळ साळवी, तिचा नवरा करणा साळवी, विजय तुपे आणि इतर आरोपींविरोधात कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नवी मुंबईत ३७ वर्षीय व्यक्तीची फसवणूक

नवी मुंबईत फसवणुकीचा अजून एक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३७ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केली आहे. बापलेकाने तब्बल ३० लाखांची फसवणूक केली आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा देतो असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

उरण भागात राहणाऱ्या बापलेकाने या व्यक्तीला फसवले आहे. दर महिन्याला २० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत पीडित व्यक्तीला ऑगस्टमध्ये ३० लाखांची गुंतवणूक करायला लावली होती, असे पोलिसांनी सांगितले. पीडित व्यक्तीला कोणताही परतावा मिळाला म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी आरोंपीविरोधात अनेक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

SCROLL FOR NEXT