Mumbai News Saam Tv
क्राईम

Accident News : मुंबईत अपघाताचा थरार, टेम्पोची बससह अनेक वाहनांना धडक; ७ जणांना उडवले

Mumbai News : मुंबईत रात्री मद्यधुंद टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने बस आणि टॅक्सीला धडक दिल्याने ६ जण गंभीर जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी चालकाला अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • दादरमध्ये रविवारी रात्री मद्यधुंद टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने बस आणि टॅक्सीला धडक दिली.

  • या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.

  • मृत व्यक्ती शहाबुद्दिन शेख हा फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा.

  • पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.

मुंबई शहरातील सर्वात गजबजलेलं ठिकाण म्हणून दादरची ओळख आहे. याचं दादरमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठा टेम्पो ट्रॅव्हलरने बस आणि टॅक्सीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जण चिरडले गेले आहेत. धक्कदायक म्हणजे हा टेम्पो ट्रॅव्हलर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं उघडकीस आलं आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक संजय धोंडू कुंभार याला अटक केली आहे.

या अपघातात शहाबुद्दिन जैनुलाब्दीन शेख याचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल अशोक पाडाळे , अक्षय अशोक पाडाळे, रोहित अशोक पाडाळे, विद्या राहुल मोटे , अभिषेक राऊतकर, अब्दुल नादीर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास एन. सी. केळकर रोडवर हुतात्मा भाई कोतवाल बेस्ट बसथांब्यावर हा अपघात घडला आहे. टेम्पो ट्रॅव्हलर संजयने शिवाजी पार्कच्या दिशेने येत असताना त्याने प्लाझा बसथांब्याकडे येणाऱ्या १६९ बेस्ट बसला उजव्या बाजूने धडक देत उभ्या टॅक्सीला धडकला. टॅक्सी पुढे उभ्या कारवर आदळली.

एक टायर फुटल्याने बस अनियंत्रित होत रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत पुढे थांब्याजवळ धडकली. काही प्रवासी व पादचारी थांब्याच्या फुटपाथवर फेकले गेले. या अपघातात सहाजण जखमी झाले तर, शेखचा जागीच मृत्यू झाला. मृत शेख हा फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करायचा. घटना घडल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर चालक संजयने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या.

पोलीस चौकशीत संजय मध्यधुंद अवस्थेत असल्याचं उघडकीस आलं आहे. शिवाय बेस्ट बस वडाळा आगारात आरटीओ तपासासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील चार जणांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

Maharashtra Live News Update : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

Chhagan Bhujbal: उठले की हॉस्पिटल, सुटले की पुन्हा हॉस्पिटल, पिऊन पिऊन किडनी खराब; मनोज जरांगेंवर कुणी केला गंभीर आरोप?

Heart attack habits youth: तरुणपणात हृदयाचे आजार का वाढतायत? डॉक्टरांनी सांगितली कारणं... बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का?

SCROLL FOR NEXT