Cyber Crime Saam tv
क्राईम

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Cyber Fraud News: एपीके फाईलच्या माध्यमातून मुंबईतील न्यायमूर्तींची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Shruti Vilas Kadam

संजय गडदे, साम टिव्ही

Cyber Crime: भारतात सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. मुंबई सारख्या शहरात देखील अनेक ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडत असतात. यासाठी पोलिस वारंवार जागृतता पसरवण्याचे प्रयत्न करते. तरी हे स्कॅम करणारे वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांना फसवतात. ताडदेव परिसरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका न्यायमूर्तीची तब्बल ९३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय तक्रारदार हे ताडदेव परिसरात राहतात आणि सध्या लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांनी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्या व्यक्तीने तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर सपोर्ट अॅप डाउनलोड करण्यास सांगत एपीके फाईल पाठवली. न्यायमूर्तींनी ती फाईल डाउनलोड करून अॅप इंस्टॉल केले. त्यानंतर तक्रार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून त्यांना १० रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरताना चुकून दोन वेळा १० रुपये पाठवले गेले. मात्र काही वेळाने त्यांनी त्यांच्या गुगल पे खात्याची तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून ९३ हजार रुपये डेबिट झाल्याचे आढळले. ही रक्कम सचिन यादव नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे समोर आले.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर हेल्पलाईन आणि ताडदेव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सावधानता म्हणून गुगलवर मिळालेल्या कस्टमर केअर नंबरवर लगेच विश्वास ठेवू नये आणि अनोळखी एपीके फाईल डाउनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

मोठी बातमी! पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT