Mumbai Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग; घाबरून मारली रस्त्यावर उडी, मुंबईतील घटना

Woman Molested By Passenger In Running Rickshaw : बोरिवलीमध्ये धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. सहप्रवाशाकडून धावत्या रिक्षात महिलेचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

संजय जाधव, साम टीव्ही मुंबई

बोरिवलीमध्ये बुधवारी (८ मे ) एका महिलेचा विनयभंग झाल्याचं समोर (Mumbai Crime News) आलंय. धावत्या रिक्षामध्येच महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. बोरिवली पश्चिमेकडे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेनं जीव वाचविण्यासाठी रिक्षातून बाहेर उडी मारली होती. सहप्रवाशाकडून धावत्या रिक्षात महिलेचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे.

ही घटना बुधवार सकाळची आहे. ही महिला (Woman Molestation) बुधवारी सकाळी शेअर रिक्षातून प्रवास करत करत होती. त्यावेळी सहप्रवाशाने संधी साधत या २९ वर्षीय महिलेचा रिक्षातच विनयभंग केला. त्यामुळे घाबरून या पीडित महिलेनं मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु, तिला कोणतीही मदत मिळाली नाही. मदत न मिळाल्यामुळे जीव वाचविण्यासाठी या महिलेनं धावत्या रिक्षातून उडी मारल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पीडित महिला किरकोळ जखमी झाली आहे.

पीडित महिलेनं बोरिवली पोलीस (Borivali Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी सहप्रवाशासह रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपी प्रवासी आणि रिक्षा चालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मुंबई नगरीत ऐरणीवर आला आहे.

मुंबईमध्ये आता पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. बोरिवलीत घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा मुंबई नगरीत खरंच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण (crime news) झालाय. शेअर रिक्षात प्रवास करताना सहप्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन केलं. धक्कादायक म्हणजे विनंती करूनही चालकाने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे महिलेनं थेट रिक्षातून खाली उडी मारली. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपी आणि रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपिटीचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Yoga Poses For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आता जिमची गरज नाही, घरीच करा हे 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT