Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल; साक्षीदाराला दिली जीवे मारण्याची धमकी

Mumbai Crime News: रियाझ भाटी विरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 2021 मध्ये खंडणीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. आपल्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी तो तक्रारदाराला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता.

सुरज सावंत

Mumbai News:

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा निकटवर्तीय रियाझ भाटी याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रियाझ भाटी याच्यावर साक्षीदाराला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी विरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 2021 मध्ये खंडणीचा एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदार हा साक्षीदार होता. आपल्याविरोधात केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी तो तक्रारदाराला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता.

दरम्यान, रियाझ भाटी आणि त्याच्या जवळच्या लोकांनी जून 2022 ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत साक्ष देणाऱ्या व्यक्तीला साक्ष न देण्यासाठी धमकवण्यात आल्याची तक्रार दिली आहे. तसेच साक्ष देण्यासाठी कोर्टात जाऊ नका, जर साक्ष देण्यास गेलात तर त्याने रियाझ भाटीच्या बाजूने साक्ष द्यावी. असे न केल्यास त्या व्यक्तीस जीवे मारण्यात येईल, अशी धमकी रियाझ भाटीने दिल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी रियाझ भाटी आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीविरुद्ध खार पोलिस ठाण्यात भादंवि कलम 195 (A), 506 (2) आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Dishes : हिवाळ्यात बाजरीची फक्त भाकरी नव्हे तर, बाजरीपासून बनवा या ५ हेल्दी डिशेस

Amrit Bharat Express: महाराष्ट्रासह देशाला मिळणार ९ नवीन अमृत भारत एक्स्प्रेस; कुठून- कुठे धावणार? तिकीट किती? वाचा सविस्तर

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करतात? जाणून घ्या

Goa Tourism : गोव्यातील 'या' किल्ल्यावरून पाहा अरबी समुद्राचे विहंगम दृश्य

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी... 'चा परदेशात डंका; भारतासह 'या' ठिकाणी गाजणार, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT