Crime News Saam tv
क्राईम

Mumbai Crime News : ३ विद्यार्थिनींचे मोबाइल नंबर मिळवले, पाठलाग करायचा; शाळेतल्या शिपायाचं धक्कादायक कृत्य

Crime News: मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Crime News:

मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका २१ वर्षीय शिपायाने शाळेतील विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघड झाल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी शालेय विद्यार्थिनींना फोन करून त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलायचा. २ नोव्हेंबरपासून आरोपीने विद्यार्थिनींना फोन करण्यास सुरूवात केली होती. तसेच शाळेच्या परिसरात देखील आरोपी त्यांच्याबद्दल अश्लिल शेरेबाजी करत होता. त्याचा मुलींना प्रचंड त्रास व्हायचा. अखेर तिघींनी घडलेल्या प्रकाराची तक्रार पालकांकडे केली.

'आरोपीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर रोजी शाळेत असताना मुलींवर अश्लील शेरेबाजी केली होती. या प्रकाराने मुली घाबरल्या. मात्र, नंतर त्यांनी याबाबत पालकांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. पालकांनी तक्रार केली,' अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.

घडलेल्या प्रकाराने अल्पवयीन मुलींना मोठा मानसिक धक्का बसला आहे. मुलींच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना सतावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT