Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: सावधान! तुमचं रेशन कार्ड खोटं आहे का? मुंबईमधून बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश

Crime News: अब्दुलने शिधापत्रिका देखील बनवून दिल्या यानंतर यातील एक व्यक्ती धान्य घेण्यासाठी चारकोपमधील शिधावाटप दुकानावर गेले असता अब्दुलने बनवून दिलेली शिधापत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईच्या चारकोप परिसरात नागरिकांना बनावट शिधापत्रिका बनवून देणाऱ्या एका व्यक्तीला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. चेतन रामेश्वर प्रजापती (33 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचा साथीदार सुनिल गुप्ता हा फरार झाला आहे. शिधावाटप अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी या दोघांविरोधात भादवि कलम 420,465,468,471,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलीस अधिक तपास करत आहे.

चारकोप परिसरातील भांबरे करवाडी परिसरात राहणारा व्यक्ती अब्दुल अव्वल खान नागरिकांना पैसे घेऊन शिधापत्रिका बनवून देण्याचं काम करत होता. 20 डिसेंबर ते 11 जानेवारी या दरम्यान अनेक व्यक्तींनी अब्दुल यांच्याकडे पैसे देऊन शिधापत्रिका बनवण्यास सांगितले. अब्दुलने शिधापत्रिका देखील बनवून दिल्या यानंतर यातील एक व्यक्ती धान्य घेण्यासाठी चारकोपमधील शिधावाटप दुकानावर गेले असता अब्दुलने बनवून दिलेली शिधापत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले. या संदर्भात दुकान चालक गणपत सिंग देवरा यांनी चारकोप पोलिसांना माहिती दिली.

यासंदर्भात दुकानदाराने पोलिसांना दिलेल्या अर्जानुसार तपासाला सुरुवात झालीये. चारकोप पोलिसांनी शिधावाटप अधिकारी ज्योती हरीश पटेल यांना ती शिधापत्रिका खरी आहे की बनावट आहे याबाबत तपास करण्यास सांगितले.

शिधा वाटप अधिकाऱ्याने शिधापत्रिका बनावट असल्याचे पोलिसांना सांगून शिधापत्रिका बनवून देणाऱ्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार चारकोप पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चव्हाण, पो. शि.जाधव, पो. शि.निमट आणि पो. शि.नन्नावरे या तपास पथकाने एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणातील एक आरोपी अद्याप होणार आहे त्याचा शोध घेण्याचे काम चारकोप पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT