Mumbai Crime News Saam Digital
क्राईम

Mumbai Crime News: हायप्रोफाइल सोसायटीत सुरू होता 'हायप्रोफाइल' जुगार अड्डा; धाड टाकली अन् पाहून पोलीसही चक्रावले

Mumbai Crime News: मुंबईतील खार (पश्चिम) परिसरातील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून जब्बल ४५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sandeep Gawade

Mumbai Crime News

मुंबईतील खार (पश्चिम) परिसरातील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून जब्बल ४५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून 34 लाख रुपये रोख रक्कम तसेच १ करोड १ लाख ५० हजार किमतीचे जुगार खेळण्याचे कॉईन्स हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मधील खार (पश्चिम) परिसरातील ओम पॅलेस, आंबेडकर रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्या सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत जुगार अड्ड्याचे ४ भागीदार, जुगार खेळण्यास ग्राहकांना मदत करणारे तीन जॉकी तसेच प्रत्यक्ष जुगार खेळणारे ३८ जण अशा एकूण ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात १२ महिला व ३३ पुरुषांचा सामावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 34 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १ करोड १ लाख ५० हजार किमतीचे जुगार खेळण्याचे कॉईन्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कलम ४ (अ) (ब), ५ जुगार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कक्ष ९ गुन्हे शाखाकडून केला जात आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पोनि सचिन पुराणिक, पोनि दीपक पवार, सपोनि उत्कर्ष वझे, सपोनि महेंद्र पाटील, पो.ह. राहुल पवार, पो.ह. विनय चौगुले, म.पो. शि. साधना सावंत, पो. शि. प्रशांत भुमकर, पो. शि. अमोल सोनावणे, पो. शि. शार्दूल बनसोडे, पो. शि. राकेश कदम, पो.ह.चा. अविनाश झोडगे यांनी पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

Amravati Tourism: अमरावतीमधील हा किल्ला देतो इतिहासाची साक्ष; एका सुट्टी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT