MUMBAI CRYPTO SCAM: MALAYSIAN CONSULATE EMPLOYEE LOSES ₹78.85 LAKH IN ONLINE FRAUD saam tv
क्राईम

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Social Media Crypto Investment Scam: मुंबईतील मलेशियन वाणिज्य दूतावासातील एका ४१ वर्षीय कर्मचाऱ्याला क्रिप्टो गुंतवणूक करणं महागलंय. गुंतवणूक करण्याच्या नादात ७८.८५ लाख रुपये एकाने त्याच्याकडून उकाळले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून 78.85 लाखांची फसवणूक.

  • ‘EG Plan’ नावाच्या ग्रुपद्वारे गुंतवणुकीचे आमिष.

  • बनावट वेबसाइटवरून क्रिप्टो गुंतवणूक करण्याचा सल्ला.

संजय गडदे,साम प्रतिनिधी

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मलेशियन वाणिज्य दूतावासात कार्यरत असलेल्या 41 वर्षीय कर्मचाऱ्याची क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 78 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत त्याला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले आणि बनावट वेबसाइटच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले.

तक्रारदार कांजुरमार्ग येथील रहिवासी असून, 20 जानेवारी 2024 रोजी त्याला ‘EG Plan’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये सुमारे 50 सदस्य होते. ‘मयती गुप्ता’ आणि ‘अर्जुन सिंग’ अशी नावे सांगणाऱ्या व्यक्ती ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. ते शेअर बाजार, आयपीओ आणि क्रिप्टो गुंतवणुकीबाबत आकर्षक टिप्स देत होते. त्यांनी www.senxaxaa.com या वेबसाइटवरून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

तक्रारदाराने 1 एप्रिल 2024 रोजी संबंधित वेबसाइटवर नोंदणी केली. सुरुवातीला त्याला 1.69 लाख रुपयांचा नफा प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा विश्वास अधिकच वाढला. त्यानंतर एप्रिल ते जून 2024 या कालावधीत त्याने ऑनलाइन बँकिंग व RTGSद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांतील 18 वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 78 लाख 85 हजार रुपये जमा केले. पोलीस तपासात उघड झाले की, ही रक्कम विविध कंपन्या, कन्स्ट्रक्शन फर्म, जेम ट्रेडर्स, केटरिंग सर्व्हिसेस आणि ट्रॅव्हल फर्म्स यांच्या नावावर असलेल्या खात्यांमध्ये वळवण्यात आली. पैशांचा मागोवा चुकवण्यासाठी ‘लेयर्ड बँकिंग नेटवर्क’ आणि म्युल अकाउंट्सचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

20 जून 2024 रोजी तक्रारदाराने वेबसाइटवर दर्शवलेला नफा काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला 18 लाख रुपये ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून भरण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची त्याला जाणीव झाली.

सामाजिक बदनामीच्या भीतीने तक्रार उशिरा

फसवणुकीनंतर तक्रारदार तीव्र मानसिक तणावाखाली होता. सामाजिक बदनामीची भीती आणि लाजेमुळे त्याने तत्काळ पोलिसांत तक्रार केली नाही. जवळपास 20 महिन्यांच्या मानसिक त्रासानंतर त्याने 10 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन ‘1930’ वर संपर्क साधला आणि त्यानंतर पूर्व विभाग सायबर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे त्याच्या कामावरही परिणाम झाल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

फसवणुकीची पद्धत कशी रचली गेली?

इन्स्टाग्रामवरून संपर्क साधून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समावेश

50 सदस्यांचा ग्रुप तयार करून ‘सोशल प्रूफ’ निर्माण

इतर सदस्यांकडून खोटे नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर

सुरुवातीला 1.69 लाख रुपयांचा प्रत्यक्ष नफा देऊन विश्वास संपादन

आकर्षक आणि व्यावसायिक दिसणारी वेबसाइट

हळूहळू गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यास प्रवृत्त करणे

क्रिप्टो फसवणुकीतील धोक्याची चिन्हे

हमखास आणि जास्त परताव्याचे आश्वासन

पैसे काढण्यासाठी ‘प्रोसेसिंग फी’ची मागणी

असंबंधित व्यवसायांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगणे

SEBI नोंदणी नसणे.

केवळ व्हॉट्सअ‍ॅप/सोशल मीडियावर आधारित गुंतवणूक सल्ला

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन आर्थिक फसवणूक लक्षात येताच तात्काळ ‘1930’ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. वेळेत तक्रार केल्यास काही प्रमाणात रक्कम गोठवणे किंवा परत मिळवणे शक्य होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT