मयुर राणे, मुंबई|ता. २५ डिसेंबर २०२३
मुंबईतील चुनाभट्टी परिसरात रविवारी (२४, डिसेंबर) गोळीबाराची घटना घडली. भरदिवसा दहापेक्षा जास्त राऊंड फायर झाल्याने परिसर हादरुन गेला होता. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता महत्वाची अपडेट समोर आली असून गोळीबार प्रकरणी चुना भट्टी पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जुन्या वादातून झाली हत्या..
रविवारी 24 डिसेंबर रोजी चुनाभट्टी परिसरात (Chuna Bhatti Area) आझाद गल्ली येथे फायरिंगची घटना घडली. या गोळीबारात सुमित येरुणकर याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चुना भट्टी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपआयुक्त हेमराज राजपूत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.
या गोळीबाराची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. आरोपींना पकडण्यासाठी नऊ पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे चार आरोपींना नवी मुंबईमधून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मृत सुमित येरुणकर 2016 मधील मोक्कामधील आरोपी असून पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सागर सावंत, सुनील पाटील, नरेंद्र पाटील , बाबू गावंड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना 12 दिवस पोलीस कोठडी नोंदवण्यात आली आहे. आरोपी आणि मृत सुमित येरुणकर यांच्यामध्ये जुना वाद होता. याच वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अधिक तपास सध्या सुरू आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.