Cuffe Parade Police Station Mumbai Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: बापाचं हैवानी कृत्य! मुंबईत दिव्यांग मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्यावर प्रकरण उघड

Cuffe Parade Rape Case: मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कफ परेड भागात स्वतःच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

Omkar Sonawane

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अतिशय घृणास्पद घटना घडली आहे. एका 20 वर्षाच्या मुक बधिर मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामुळे ती गर्भवती झाली आहे. डीएनए टेस्टमध्ये तिच्या वडिलांचे आणि पोटात असलेल्या बाळाचा डीएनए एकच असल्याने पोलिसांनी या नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना मुंबई येथील कफ रोड येथील आहे. पोलिसांनी सांगितले की मुलीच्या बापाला अटक करण्याआधी 17 जणांचे डीएनए चाचणी केली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक दोन लोकांना अटक केली होती. त्यामध्ये एका 17 वर्षाचा मुलगा ही होता. या सगळ्यांना त्यामुलीने ओळखले ही होते. यामुळे संशयाची चाहूल अधिकच वाढत गेली. पोलिसांनी सांगितले की ही घटना भयावह आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये त्या मुलीने आपल्या आजीला सांगितलें की, माझ्या पोटात दुखते आहे. पोटाला हात लावून सांगितले की पोटात काहीतरी वळवळ करते आहे. त्यानंतर लगेचच तिला जवळच्या एक हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी तपसात केल्यावर लक्षात आले की तिच्या पोटात पाच महिन्याचे बाळ आहे. हॉस्पिटलने लगेचच पोलिसांना याबाबाबत माहिती दिली.

पोलीस म्हणाले की सुरुवातीला त्यामुलीसोबत बोलायला अडचण आली कारण ती बोलण्यास तयार नव्हती. यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांशी बोलले. यावेळी त्यांनी बलात्कार झाला नसल्याचे सांगत कुठल्याही प्रश्नाचे समाधानकाराक उत्तर दिले नाही. ती गर्भवती कशी झाली याचा गुन्हा दाखल करण्यास देखील नाही म्हणत होता. त्यानंतर समपुदेशन केल्यानंतर ती मुलगी गुन्हा दाखल करण्यास तयार झाली.

17 जणांच्या डीएनए चाचणीमध्ये नराधम बाप पॉझिटिव्ह

मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन जणांना आणि एका मुलाला अटक केली. यासोबतच तिच्या बापासह 17 जणांचे डीएनए आणि रक्ताच्या काही चाचण्या केल्या. यानंतर बलात्कार करणाऱ्याची ओळख पटली. जी की तिच्याच वडिलांची होती. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, त्या मुलीवर बलात्कार मागच्या वर्षी मार्च ते सप्टेंबरच्यामध्ये झालेला असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT