Maharashtra Crime News: Saamtv
क्राईम

Sachin Kurmi Killed : खळबळजनक! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची निर्घृण हत्या

Maharashtra Crime News: भायखळा परिसरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई

राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा परिसरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही थरारक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन कुर्मी हे शुक्रवारी (ता. ४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात थांबले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा कुर्मी हे जखमी अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? या हल्ल्याचे कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वाठी आधार कार्ड ग्राह धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT