Mira Bhayandar News Saamtv
क्राईम

Mira Bhayandar Crime: मिरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई! ट्रक चोरी करणाऱ्या टोळीला अटक; तब्बल ७ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mira Bhayandar News: मिरा भाईंदर गुन्हे शाखा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत राष्ट्रीय पातळीवर ट्रक चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल सात कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

Gangappa Pujari

महेंद्र वानखेडे,मिरा भाईंदर|ता. ४ मार्च २०२४

Mira Bhayandar Crime:

मिरा भाईंदर गुन्हे शाखा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत राष्ट्रीय पातळीवर ट्रक चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल सात कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी वाहने चोरी करून परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतले आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाडी गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागालँड व इतर राज्यातील विविध आरटीओ कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त करत होते.

त्या कागदपत्रांच्या आधारे सदर चोरी केलेली वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन कारवाईची असल्याचे सांगून सदर महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कार्यालयातून एनओसी प्राप्त करून विक्री करत असल्याचं समोर आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी काशीमिरा पोलीस ठाण्यात ट्रक चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांनी काशीमिरा गुन्हे शाखा-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांच्याकडे तपासाचे सूत्र सोपवली. गुन्हे शाखा एकच्या टीमने दिवस रात्र तपास करत करत अजहर अकबर शेख राहणार,समीर नासीर खान राहणार छत्रपती संभाजी नगर,मोहम्मद शकील शाह राहणार अमरावती, शेख नासीर शहजादमिया राहणार नांदेड यांना अटक केली.

दरम्यान, हे सर्व आरोपी गॅरेज आणि गाड्यांची खरेदी विक्रीच काम करत असून चोरीच्या गाड्या देखील विक्री केल्याचं निष्पन्न झाले. तसेच या आरोपींवर एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचं आढळून आले आहे.यामध्ये एक राजस्थान आणि उत्तरप्रदेश मध्ये दाखल आहे. या आरोपींकडून चोरीच्या एकूण ४७ वाहने जप्त करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT