Udhayanidhi Stalin Sanatan Dharma Remarks: सर्वोच्च न्यायालयाने डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिनला फटकारलं

Supreme Court Hearing: सनातम धर्मावर वादग्रस्त विधान करण्यावरून सर्वोच्च न्यायालायाने उदयनिधी स्टॅलिनला फटकारलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केली होती.
Udhayanidhi Stalin
Udhayanidhi Stalinsaam Tv

Udayanidhi Stalin Sanatan Dharma Remarks Supreme Court :

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केलाय. आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दिलासा मागत आहात. तुम्ही सामान्य माणूस नाही, राजकारणी आहात. अशा टिप्पण्यांचे काय परिणाम होतील, हे तुम्हाला माहीत असायला हवे होतं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारलं आहे.(Latest News)

उदयनिधी यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया, डेंग्यूशी केली होती. त्यानंतर अनेक राज्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणातून सुटका व्हावी, यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उदयनिधी यांना फटकारलं आहे. या प्रकरणावर झालेल्या सुनावणीची माहिती स्टॅलिनचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या खटल्यांच्या वस्तुस्थितीवर भाष्य केलं नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर स्टॅलिनचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, ते नोंदवलेल्या खटल्यांच्या वस्तुस्थितीवर भाष्य करत नाहीत. मात्र याआधीही सर्वोच्च न्यायालयात याच प्रकरणाशी संबंधित खटले एकत्र येत आहेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मूमध्ये खटले दाखल झाले आहेत. सध्या न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी पुढे ढकललीय, असं स्टॅलिनचे वकील सिंघवी म्हणाले.

“तुम्ही कलम १९ (१) ए आणि २५ अंतर्गत तुमच्या अधिकारांचा गैरवापर केलाय. तुम्ही म्हणालात माहीत आहे का? तुम्हाला याचे परिणाम जाणून घ्यायला हवे होते, तुम्ही मंत्री आहात, सामान्य माणूस नाही, असे प्रश्न करत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. मला उच्च न्यायालयात जावे लागले तर मी बांधला जाईल. हे छळवणूक वाटेल,असं स्टॉलिन याच्या वकिलाने सांगितले. यानंतर सुप्रीम कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणी घेतली जाईल असं सांगितलं.

Udhayanidhi Stalin
Supreme Court on AAP Office : आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिल्लीतील कार्यालय 15 जूनपर्यंत रिकामे करण्याचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com