Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: ३२७ कोटींचे ड्रग्ज जप्त, तस्करांची टोळी जाळ्यात अडकली, मास्टरमाइंड सलीम डोळा फरार

Mumbai Crime: मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ ने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला गजाआड केलंय. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार सलीम डोळा हा फरार झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळी मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ च्या जाळ्यात अडकलीय. या टोळीकडून ३२७ करोड ६९ लाख रुपयाचा ड्रग्ज जप्त केलंय. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून ३, तेलंगणामधून ३, उत्तर प्रदेशमधून ८ आणि गुजरातमधून १ अशा एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यासोबतच तीन पिस्तल १ रिव्हॉलवर ३३ जिवंत काडतुसेदेखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

ही टोळी संपूर्ण देशभरात कार्यरत होती, यामधील पैशाची उलाढाल करणारा मुख्य आरोपी सलीम डोळा हा सध्या फरार असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. त्याचा शोध पोलिसांकडून केला जातोय. या एम.डी.ड्रग्स तस्करीमध्ये सलीम डोळा हा प्रमुख असून काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. देशभरात सलीम डोळाच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. डोळा हा सर्व कारोबार दुबईमधून चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मिरा भाईंदर गुन्हे शाखा एकच्या टीमने नाकाबंदी वेळी १५ मे रोजी काशीमिरा भागातून शोएब मेमन व निकोलेस हे दोघे एम.डी. ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी दोन कोटी रुपयांचे एम.डी.ड्रग्स जप्त केले. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स तेलंगणामधून आणले असे समजताच पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे रवाना झालं. तेलांगणामधील विकाराबाद जिल्ह्यातून नासिर उर्फ बाबा शेख, दयानंद उर्फ दया माणिक यांना ताब्यात घेत २५ कोटी रुपयांचे एम.डी. ड्रग्स आणि कारखाना सील करण्यात आलंय. यानंतर या प्रकरणात मोठी टोळी कार्यकरत असल्याचं निष्पन्न झालं.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या टीमने सखोल तपास करत महाराष्ट्र ,गुजरात,उत्तर प्रदेश,हैदराबाद मधून एकूण १५ जणांना ताब्यात घेत ३२७ करोड ६९ लाख रुपयाचा एम.डी.(मॅफेड्रॉन)ड्रग्स जप्त केलं. यांचा मुख्य सूत्रधार सलीम डोळा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असून पोलीस त्यांचा तपास करत आहे. यामध्ये अधिक ५ ते ६ आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेतील बनावट नोकरभरती घोटाळ्यात पोलिसांची कारवाई,मुख्य सूत्रधार राजेंद्र खेडेकरला अटक

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

Mangalsutra Designs: महिलांसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ‘हे’ ५ शॉर्ट मंगळसूत्र पॅटर्न्स; मॉडिश आणि क्लासी लूकसाठी बेस्ट

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT