Nashik Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: खळबळजनक! गोराई बिचवर आढळला महिलेचा मृतदेह, शरीराचे केले होते ७ तुकडे

Mumbai Crime: मुंबईमधील गोराई बीचवर एका साडीत महिलेचा मृतदेह गुंडाळला होता. हा मृतदेहाचे ७ तुकडे केले होते. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

गोराई बिचवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे सात तुकडे केलेत. एका प्लास्टिक बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे गोणीत गुंडळाले होते. हत्या झालेल्या व्यक्तीचे वय साधरण ३० वर्ष असावं असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान बीचवर मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आलाय. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून गोराई पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. गोराई पोलिसांनी मुंबईतील बाबरपाडा भागातील शेफाली गावातून मृतदेह ताब्यात घेतलाय. फॉरेंसिक टीम या घटनास्थळी पोहोचले असून येथील जागेची तपासणी केली जात आहे. तसेच पंचमाना केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. जवळच्या पोलीस ठाण्यातून सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती गोळा केली जात आहे की, एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तर आधी मृतदेहाची ओळख पटू शकते.

मोबाईलवर गेम खेळताना दिसले आईचे प्रिकरासोबतचे व्हिडिओ

दरम्यान मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईचा गळा चिरुन तिला गंभीर जखमी केले आहे. संबंधित महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा अल्पवयीन असून हा इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. त्याला एका फोनमध्ये आपल्या आईचे कथित प्रियकरासह अश्लील फोटो व व्हिडिओ सापडले. याचा त्याला राग आला. त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केलाय.

पोलिसांनी संबंधित युवकाला डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडल्याचे म्हटले जात आहे. मुलगा त्याच्या आईसोबत घरी होता. यावेळी आईच्या मोबाईलवर तो गेम खेळत होता. गेम खेळता खेळता आईचे आणि तिच्या कथित प्रियकराचे काही अश्लील व्हिडिओ व फोटो त्याला दिसले. त्यानंतर त्याने हे कृत्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT