अभिजीत देखमुख, कल्याण|ता. ६ फेब्रुवारी २०२४
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लिपिकासह निवृत्त कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहत्या घराला मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या बदल्यात 50 हजाराची लाच स्वीकारताना पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महालेसह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कर्ड्क या दोघांना ठाणे अँटी करप्शनच्या पथकाने केडीएमसीच्या एच वॉर्डात रांगेहाथ अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडे (Dombivli West) राहणाऱ्या तक्रारदाराने कर्डक यांना घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते. मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती. यामुळेच संतापलेल्या तक्रारदाराने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच आपण निवृत्त झालेले असल्याने संबधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्याने पुन्हा तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. हे पैसे कर्डकच्या वतीने पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महाले याने स्वीकारताच अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.