Latur Crime  Saam Tv
क्राईम

Crime: मध्यरात्री रक्तरंजित थरार! लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या, मैत्रिणीवरही चाकूने सपासप वार

Latur Crime: लातूरमध्ये भयंकर घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तर त्याच्या मैत्रिणीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये ती देखील गंभीर जखमी झाली.

Priya More

लातूरमध्ये मध्यरात्री हत्याकांडाची भयंकर घडली. गाडीला कट का मारला? असा जाब विचारत तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी दोघांना चाकूने भोसकलं. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाला. या हल्ल्याप्रकरणी लातूर पोलिलांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यासाठी सोलापूरहून आलेल्या तरुण आणि तरुणीवर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला. मध्यरात्री पाच नंबर चौकाकडून औसाला जाणाऱ्या बायपास रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. गाडीला कट का मारला? या कारणावरून सोलापूर येथील अनमोल कवठे आणि सोबत असलेल्या सोनाली भोसले या दोघांवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात अनमोल कवठे याचा मृत्यू झाला तर सोबत असलेली सोनाली भोसले ही गंभीर जखमी आहे. तिच्यावर सध्या लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्यातील मयत अनमोल कवठे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते आहे. अनमोलवर देखील खंडणी सारखे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार देखील करण्यात आलं होतं.

तर घटनेतील आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केली. आरोपीने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर चाकूने सपासप वार केले. चाकू गळ्यामध्ये आरपार गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनमोलची मैत्रीण सोनालीवर आरोपीने चाकूने छातीवर तीन आणि पाठीवर दोन वार केले. सोनालीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेमागे नेमका कोण मास्टरमाइंड कोण आहे? त्याचा तपास आता लातूर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अकोला-शेगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा अपघात

Walmik Karad : आरोपी कराडला झाला गंभीर आजार, ३ दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

Homemade Hair Serum Tips: केस धुतल्यानंतर दिसतील सिल्की आणि शायनी, घरी बनवलेलं 'हे' हेअर सीरम लावा

Pune Gangwar : पुण्यात पुन्हा गँगवॉर! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची निर्घृण हत्या; बस स्टँडवरच गोळ्या झाडल्या अन् कोयत्याने वार

Konkan Tourism : सरकारचा मोठा निर्णय! ३१ ऑगस्टपर्यंत जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स बंद

SCROLL FOR NEXT