crime news  Google
क्राईम

Crime News: पतीबरोबरचा वाद मुलींच्या जीवावर बेतला; मुलींसोबत घेतली यमुना नदीत उडी, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Wife Jumped In Yamuna River With Daughter: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलींसह यमुना नदीत उडी घेतली आहे. डॉक्टरांनी तिन्ही मुलींना मृत घोषित केले. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Rohini Gudaghe

Mathura News Husband Wife Dispute

सोमवारी संध्याकाळी मथुरा (Mathura) येथील यमुना पुलावरून एका महिलेने आपल्या तीन मुलींसह उडी मारली. या घटनेत महिलेच्या तीनही मुलींचा मृत्यू झाला आहे. तर महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या महिलेला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.(Latest Crime News)

पतीसोबत झालेल्या वादानंतर तिने आपल्या तीन मुलींसह यमुनेत (yamuna river) उडी घेतल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतर तिचा नवरा तिला मारहाण करायचा. गेल्या चार वर्षांपासून मारहाणीचा प्रकार शिगेला पोहोचला होता. कोसिकलन येथील महिलेशी पतीचे संबंध असल्याचा संशय या महिलेला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिन्ही मुलींचा जागीच मृत्यू

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासाअंती पूनम या महिलेने तिच्या पतीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याचे सांगितले. या मुद्द्यावरून सोमवारी त्यांच्या घरात भांडण झालं होतं. यानंतर ती महिला तिच्या तीन मुली, आठ वर्षांची मुलगी अंशिका, सहा वर्षांची वंशिका आणि तीन वर्षांची चारू यांना घेऊन रिक्षाने हंसगंजला पोहोचली. ती थेट यमुना पुलावर आली. काठावर काही वेळ उभं राहून विचार केल्यावर तिने आपल्या तीन मुलींसह यमुनेत उडी (Jumped In Yamuna River) घेतली.

यमुना पुलाजवळ उपस्थित असलेल्या लोकांनी महिलेला उडी मारताना पाहिल्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, काही लोकांनी नदीत उड्या मारून त्यांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या तिन्ही मुलींचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला (Mathura News) होता. फुफ्फुसात पाणी भरल्याने महिलेची प्रकृतीही गंभीर होती. अशा परिस्थितीत महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पतीला अटक

तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पूनमचा पती हरिओमही घटनास्थळी पोहोचला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मथुराचे एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय (Husband Wife Dispute) होता. त्यामुळे तिन टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळची राजस्थानच्या ढोलपूरची राहणारी पूनम हिचा विवाह मथुरा येथील हरिओम याच्याशी जानेवारी 2015 मध्ये झाला होता.

हरिओम मोबाईल आणि टीव्ही दुरुस्तीचे काम करतो. त्याचे कोसीकलन येथील एका महिलेशी संबंध असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमचे ​​रविवारीच या महिलेशी भांडण झाले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. मात्र, त्यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत करून घरी पाठवलं होतं. सोमवारीही याच मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण झालं होतं. पूनमने सांगितले की, त्या महिलेमुळे तिचा नवरा तिला रोज मारहाण करायचा आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा. तिला घरखर्चाला पैसे देत नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT