bihar News Update  AI Photo
क्राईम

कर्जाचा हप्ता घ्यायला आला, महिला प्रेमात पडली, नवऱ्याला सोडून त्याच्यासोबत चूल मांडली

bihar News Update : मागील पाच महिन्यापासून ते गुपचूप भेटत होते. आता त्यांनी संसार थाटलाय. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Namdeo Kumbhar

Bihar News : कर्जाचा हप्ता घ्यायला आलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या प्रेमात विवाहित महिला पडली. नवऱ्याला सोडून तिने त्या व्यक्तीबरोबर संसार थाटला. बिहारमधील जुमी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. बँक कर्मचारी कर्जाचे हप्ते घेण्यासाठी महिलेच्या घरी जात होता. त्यांच्यामध्ये बोलणं वाढलं अन् प्रेमाचा अंकूर फलला. मागील पाच महिन्यापासून ते गुपचूप भेटत होते. आता त्यांनी संसार थाटलाय. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

नेमकं प्रकरण काय आहे?

11 फेब्रुवारी रोजी हे दोघेजण विवाहबंधनात अडकले. जमुई नगर परिषदअंतर्गत बाबा भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांनी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्न केले. बँक कर्मचाऱ्याचे नाव पवन कुमार असे आहे. तो जाजल गावातील राहणारा आहे. महिलेचं नाव इंद्रा कुमारी असे आहे. ती कर्माटांड येथील राहणारी आहे.

महिलेनं बँकेतून घेतलं होतं कर्ज

पवन कुमार फायन्स बँकेत काम करतो. विवाहित महिला इंद्रा कुमारी यांनी एका खासगी बँकेतून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे हप्ते घेण्यासाठी पवन नेहमीच इंद्रा कुमारीच्या घरी येत होता. दोघांमध्ये बोलणं वाढले. इंद्रा कुमारी याचं पवन याच्यावर प्रेम जडलं. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गुपचूप भेट होते. तास तास दोघे एकमेंकाना फोनवर बोलत होते. ४ फेब्रुवारी रोजी इंद्रा कुमारीने नवऱ्याला सोडलं अन् पवन कुमार याच्यासोबत फरार झाली.

लग्नानंतर पहिल्या नवऱ्याविरोधात तक्रार -

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रा कुमारी हिचं लग्न २०२२ मध्ये झालं होतं. तिचा नवरा सारखाच दारू प्यायचा अन् दररोज मारहाण करायचा. त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यासोबत इंद्रा कुमारीचं सूत जुळलं. पाच ते सहा महिने गुपचूप भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर इंद्रा कुमारीने नवरा अन् कुटुंबियांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार तिने पोलिसांत दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT