MP Crime Saam Tv
क्राईम

MP Crime News: धक्कादायक! भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी वहिनीला जिवंत जाळलं

Crime News: मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. येथे एका व्यक्तीने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी वहिनीला जिवंत जाळल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

MP Crime Man burnt His sister in law :

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील ढोढर चौकी परिसरात धक्कादायक घटना घडलीय. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या वहिनीला जिवंत जाळल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह शवविच्छेनदासाठी पाठवला आहे. निर्मला बलई, असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बलई ,असं आरोपीचं नाव आहे. रतलाम जिल्ह्यातील रिंगनोद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या ढोढर चौकी परिसरात एका व्यक्तीने आपल्या वहिनीला जिवंत जाळले. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या भावाने आत्महत्या केली होती. भावाच्या आत्महत्येमागे वहिनीचा हात असल्याचा संशय आरोपीला होता. काही दिवसांपूर्वी सालखेडी येथे आरोपी सुरेशचा मोठा भाऊ प्रकाश याने आत्महत्या केली होती. वहिनीमुळेच भावाने आत्महत्या केल्याचा संशय सुरेशला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने वहिनीच्या हत्येचा कट रचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पेट्रोल टाकून लावली आग

आरोपी सुरेश बलईने आपली वहिनी निर्मला बलई हिच्या डोक्यावर रॉडने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. जोपर्यंत महिला पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत त्याने कोणालाच घटनास्थळी येऊ दिलं नाही. रिंगनोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाण्याचे प्रभारी पतीराम डाबरे, ढोढर चौकीचे प्रभारी नागेश यादव घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी सुरेश बलाईला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT