Buldhana News Saam Tv
क्राईम

Shocking : संतापजनक! शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नोट्स आणि प्रॅक्टिकल मार्क देतो सांगून रूमवर नेलं अन्...

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • शिक्षकाने विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क्सचे आमिष दाखवून खोलीत नेले

  • अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

  • विद्यार्थिनीने धैर्य एकवटून पोलिसांत तक्रार दाखल

  • आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी, पुढील तपास सुरू

विद्यार्थी आणि शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाण्यातील मलकापूर येथून समोर आली आहे. विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मुकेश परमसिंग रबडे (वय ४०, रा. तरोडा, ता. मोताळा) हा परिचित असल्याने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी “नोट्स आणि प्रॅक्टिकल मार्क देतो” असे सांगून तहसील चौकात बोलावले. तेथून त्याने तिला पंचमुखी जवळील एका रूममध्ये नेले. रूममध्ये आरोपीने पिडीतीची मैत्रिणी हिला व्हिडिओ कॉल करून “स्क्रिन रेकॉर्डिंग कर” असे सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

त्यानंतर पिडीतीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. रात्रभर त्याचं रूम मध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तिला परत सोडताना “प्रकार कोणाला सांगितला तर व्हिडिओ व्हायरल करीन” व तुझ्या भावाला व वडिलांना ठार मारेल अशी धमकी दिली गेली. मात्र काही दिवसांपूर्वी पीडीतेच्या मैत्रिणीने रेकॉर्डिंग व्हायरल केल्याने पिडीतीच्या कुटुंबाच्या निदर्शनास हा प्रकार आला.

त्यानंतर पीडित मुलीने वडिलांना सत्य सांगून पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कलम 64(2) (f),64 (2) (m), 115(2), 351(2),3(5). BNS सहकलम 4,6 पॉक्सो सहकलम 67 आणि तंत्रज्ञान अधिनियम अन्वये पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी शिक्षकास अटक केली असून त्याला 10 डिसेंबर पर्यंत न्यायाल्याने पोलीस कस्टडी ठोठवली आहे..पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नागपूर विमानतळावर पोहचतील

Weather Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात मुसळधार पाऊस कोसळणार, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

केक खाताच गुंगी आली; महिलेवर कारमध्ये नेऊन बलात्कार, ठाण्यात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT