Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

Mahaparinirvan Din Dadar Chaityabhumi : इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे ५०% काम पूर्ण झाले आहे. ३५० फूट उंच पुतळ्याची उभारणी वेगाने सुरू असून २०२६ मध्ये स्मारकाचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन
Maharashtra NewsSaam Tv
Published On
Summary
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ५०% काम पूर्ण

  • ३५० फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याची उभारणी सुरू

  • २०२६ मध्ये लोकार्पणाचे लक्ष्य

  • संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृहाची कामे पूर्ण

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ साली राहत्या घरी अखेरचा श्वास सोडला. हा दिवस पददलितांसाठी काळा दिवस ठरला. आज बाबासाहेबांना दादर येथील चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी आदरांजली वाहिली. यादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून २०२६ मध्ये याचं अनावरण करण्यात येणार आहे.

६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन
Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे.

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन
Shocking : नगरमध्ये खळबळजनक घटना, ९ वीच्या मुलीला ‘तलब जिहाद’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, महिला शिक्षिकेचा प्रताप उघड

सध्या स्मारकाचे ५०% काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि ३५० फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे सुरु असून, बाहेरील विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे स्मारक खुले होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन
Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. १०० फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर ३५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू आहे तर पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com