Buldana Crime Saam Tv
क्राईम

Crime: मित्राला घरी आणल्यामुळे वाद, तरुणाने सख्ख्या भावाची चाकूने वार करत केली हत्या

Buldana Crime: बुलडाण्यामध्ये तरुणाची सख्ख्या भावाने हत्या केली. किरकोळ वादातून ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे बुलडाणा हादरले.

Priya More

Summary -

  • बुलडाण्यात तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

  • लहान भावाने मोठा भावाची चाकूने भोसकून हत्या केली

  • किरकोळ वादातून दोघांमध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर हा प्रकार घडला

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

बुलडाण्यामध्ये किरकोळ वादातून तरणाने सख्ख्या भावाची हत्या केली. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बुलडाणा हादरले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोघात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. लहान भावाने मोठ्याची हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे किरकोळ वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. देविदास महादेव गायकी (वय २८ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. देविदासचा छोटा भाऊ मंगेश महादेव गायकी( २५ वर्षे) याने त्याची हत्या केली.

देविदास ५ मार्च रोजी दुपारी मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी लहान भाऊ मंगेशने त्याच्या मित्राला घरी जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीत हाणामारी झाली. रागाच्या भरात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने देविदासच्या पोटात आणि कमरेवर वार केले.

या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव होऊन त्याचा जागीत मृत्यू झाला. सुरूवातीला कुटुंबीयांनी पोलिसांना चुकीची माहिती देऊन मंगेशला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी मंगेशने गुन्ह्याची कबुली दिली. शवविच्छेदन अहवालातून देखील देविदासची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT